काँग्रेसचा प्रचार करणारे मनपा कर्मचारी बडतर्फ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सांगली : आचारसंहिता काळात काँग्रेस पक्षाचा प्रचार करणाऱ्या महापालिकेतील दोघा कर्मचाऱ्यांना आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज बडतर्फ केले. सफाई कर्मचारी चंद्रबोधी प्रदीप एरंडोलीकर आणि कबड्डी खेळाडू स्वप्नील दत्तात्रय कदम अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही मानधनावर महापालिकेच्या सेवेत कार्यरत होते. दरम्यान, त्या दोघांचे रॅलीतील छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यावरुन तक्रारी आल्याने आयुक्तांनी खातरजमा करुन कारवाई केली. 
महापालिकेत मानधनावरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

बहुतंश लोकांची भरती राजकीय नेत्यांचा सांगण्यावरुन केली जाते. विशेषतः खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर सेवेत घेण्यात आले आहे. परिणामी मानधनावरील कर्मचारी पक्षाचे कार्यकर्तेच असतात. त्यांनाही आचारसंहितेचे बंधन लागू असते. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात, प्रचार फेरीत सहभागी होवून नये, असे स्पष्ट संकेत आहेत. असे आसतानाही चंद्रबोधी एरंडोलीकर व स्वप्नील कदम हे काँग्रेसच्या प्रचारात दिसून आले. काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमात हे दोघे कर्मचारी इच्छुकाच्या समर्थन रॅलीत सहभागी झाले होते. त्याचे छायाचित्र सोशल मिडियावरही व्हायरल झाले. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे तक्रारी आल्या. आयुक्तांनी त्या तक्रारींची खातरजमा करुन बडतर्फची कारवाई केली. 

"राज्य निवडणूक आयोगचे निर्देश व आचारसंहिता नियमानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकिय पक्षाच्या प्रचार फेरीत व प्रचारात सहभाग घेणे म्हणजे ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल.'' 

- रवींद्र खेबुडकर, मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त 

Web Title: Staff of the Congress campaign