यंत्रमाग कामगारांच्या 'कल्याणकारी'ची माहिती द्या : आमदार सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

कोल्हापूर - राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठविण्यात येण्याबाबत दिलेल्या आदेशाचे नेमके काय झाले, असा तारांकित प्रश्‍न विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर - राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठविण्यात येण्याबाबत दिलेल्या आदेशाचे नेमके काय झाले, असा तारांकित प्रश्‍न विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवावा, असे आदेश कामगार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री यांनी कामगार विभागाला जानेवारी 2016 च्या दरम्यान दिले होते. याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे जानेवारी 2017 मध्ये निदर्शनास आले आहे. हे सत्य आहे काय? असल्यास या प्रस्तावावर शासनाने कोणती कार्यवाही केली? त्याच्या विलंबाची कारणे स्पष्ट करा, असा तारांकित प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
संबंधित प्रश्‍नाला कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ""यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्या आधारे विविध विभागाचे अभिप्राय मागविले आहेत. 20 एप्रिल 2016 रोजी वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 अंतर्गत महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन झाल्यावर यंत्रमाग कामगारांचा विचार केला जाईल.''

Web Title: Star question by MLA Satej Patil