कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

सोलापूर - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी विभागातील कचरामुक्त शहरांना आता तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहे. त्यासाठी बारा निकष निश्‍चित करण्यात आले असून, प्रत्येक वर्षी पुनर्मूल्यांकन व पुनर्प्रमाणीकरण केले जाणार आहे. हे मानांकन एक ते सात असे असेल. 

ऑक्‍टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देश स्वच्छ करण्याच्या उद्देशनाने 2 ऑक्‍टोबर 2014 पासून "स्वच्छ भारत' अभियान राबविले जात आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची (नागरी) अंमलबजावणी राज्यभरात 15 मे 2015 पासून केली जात आहे. त्याअंतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घटनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे या दोन बाबींचा समावेश आहे. 

राज्यातील नागरी भाग 1 ऑक्‍टोबर 2017 रोजी हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. घनकचरा अभियानांतर्गत शहरे स्वच्छ करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तथापि, नागरी भागात व सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांकडून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

मानांकनासाठी यांचा विचार 
- घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे 
- निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण 
- सार्वजनिक, औद्योगिक, रहिवास भागातील साफ-सफाई 
- शहरातील कचरा पेट्या व आणि पदार्थ पुनर्प्राप्ती सुविधा 
- कचरा निर्माण करणाऱ्यांकडून नियमांचे पालन 
- कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया 
- अस्वच्छतेबाबत शिक्षा, दंड व वापरकर्ता शुल्क आकारणी 

Web Title: Star rating for garbage-free cities