दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवात

हुकूम मुलाणी 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवातावरण झाली.

आज सकाळी 9 वाजता याच मंडपात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी विष्णूपंत आवताडे, प्रभाकर घुले, विठ्ठल गायकवाड, राहुल सावंजी, सतीश दत्तु
धोंडाप्पा गणेशकर, नंदकुमार साळुखे, विनायक दत्तू, चंद्रकांत काकडे, परमेश्वर पाटील, उमेश आवताडे, निलेश क्षीरसागर  आदी उपस्थित होते. दिवसभर आंदोलनास्थळी अनेक मान्यवरांनी भेट देवून या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील प्रभाग, तालुक्यातील 8 पंचायत समिती गण व विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलन स्थळी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी भेट दिली. तसेच 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. दामाजी चौक ते प्रांतकार्यालय असा सकल मराठा समाजाच्या वतीनेमोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: Start maratha agitation in Damaji Chowk