सांगलीत तूर हमीभाव केंद्रास प्रारंभ

toor.jpg
toor.jpg

सांगली- नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को ऑप-मार्केटींग फेडरेशन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने मार्केट यार्डातील विष्णुआण्णा सहकारी खरेदी-विक्री संघ येथे तुर हमीभाव केंद्राचा आज सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

क्विंटलचा भाव 5800 रूपये इतका आहे. खरेदी केंद्रावर हेक्‍टरी एकच क्विंटल तुर खरेदी केली जाते. त्यामध्ये वाढ करून दहा क्विंटलपर्यंत खरेदी केली जावी यासाठी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असे सभापती पाटील यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक वर्षी तुर हमीभाव केंद्र सुरू केले जाते. यावर्षीही हे केंद्र सुरू करण्यात आले. त्याचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला. विष्णुआण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, संचालक मारुती पाटील, मार्केटिंग फेडरेशचे अधिकारी दिलीप पाटील, आर एम. दानोळे, शिवाजी पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, सहा सचिव जे. के. पाटील, संघाचे व्यवस्थापक सुभाष मस्कर, सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते. 


या केंद्रामध्ये पहिल्या दिवशी जत तालुक्‍यातील आठ ते दहा शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. प्रति क्विंटल पाच हजार 800 इतका भाव देण्यात येणार आहे. हे केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
हमीभाव केंद्रामार्फत एकरी एक क्विंटलच तुर घेतली जाते. त्यामुळे या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे गत वर्षाप्रमाणे एकरी दहा क्विंटल तूर खरेदी केली जावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे बाजार समितीच्यावतीने सहकार व पणनमंत्री पाटील यांच्याकडे खरेदीची मर्यादा वाढवली जावी यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सभापती पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com