आयुषमान भव ः प्रकृती सुधारली, हॉस्पिटल तेथेच होणार

आयुषमान भव ः  प्रकृती सुधारली, हॉस्पिटल तेथेच होणार

नगर : "राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन'अंतर्गत शहरात "आयुष' हॉस्पिटल होत आहे. या "आयुष'च्या अनेक अडथळे पार करत काल (शनिवार)पासून सुरवात झाली. हे काम पूर्वीच्याच आराखड्याप्रमाणे होणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या 34 हजार 557 चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या कामाच्या सात कोटी 31 लाख 63 हजार 625 रुपयांच्या निविदेला मंजुरी देऊन त्यातील सुमारे एक कोटीचा निधीही वर्ग करण्यात आला.

त्या शाळेचा होता विरोध

कामाच्या सुरवातीलाच "त्या' शाळेने "मैदान वाचवा' आंदोलन केल्यानंतर हे काम स्थगित केले. त्यानंतर पुन्हा आराखडा बनविण्यात आला होता. दुसरा आराखडा पूर्व-पश्‍चिम असा करण्यात आला होता. सामाजिक संघटनांचा दबाव प्रशासनावर वाढत गेला. सामाजिक संघटनांनी "आयुष'च्या बदलत्या आराखड्याला विरोध केल्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने सखोल चौकशी केली. दोन्ही आराखड्यांवर वास्तुविशारदांची मतेही जाणून घेण्यात आली. यामध्ये वास्तुविशारदांनी पूर्वीचा दक्षिणोत्तर आराखडा हॉस्पिटलसाठी योग्य आहे. 

पूर्वीचाच आराखडा सोयीचा

आराखड्याप्रमाणे हे हॉस्पिटल झाले, तर त्यामध्ये सूर्यप्रकाश चांगला राहून हवाही खेळती राहणार आहे. तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉस्पिटलचा विस्तार करायचा असेल, तर उर्वरित जागा त्यासाठी उपयोगात आणता येईल, असे अहवालात म्हटले होते. दुसऱ्या आराखड्यानुसार इमारतीची उभारणी केली, तर त्यामध्ये सूर्यप्रकाश व हवा कमी प्रमाणात खेळती राहील. तसेच भविष्यात हॉस्पिटलचा विस्तार करायचा म्हटले, तर शक्‍य होणार नाही. दुसरा आराखडा शासकीय जागेचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे पूर्वीच्याच दक्षिणोत्तर आराखड्यानुसारच "आयुष'चे काम व्हावे, आर्किटेक्‍ट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यामुळे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे आयुषच्या कामास शनिवार (ता. 25) पासून सुरवात झाली. 

नऊ महिन्यांत होणार काम

हे काम येत्या नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे या जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कोट आर्किटेक्‍ट यांनी तयार करून दिलेल्या नकाशाप्रमाणेच आयुषच्या इमारतीचे काम सुरु झाले आहे. त्यात बदल झालेला नसून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सकाळला सांगितले.

सकाळचा पाठपुरावा

 "आयुष' रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. नेमक्‍या त्याच रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाला अडकाठी आणली जात असल्यामुळे सामाजिक भावनेतून आम्ही या प्रकरणाचा अभ्यास करून इमारत उभी रहावी, यासाठी आम्ही लढा उभारला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी यांच्याबरोबरच सकाळने मोलाची साथ दिली. त्यामुळे या इमारतीच्या कामास सुरवात झालेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केले.

प्रशासनाचे अभिनंदन

जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयुष हॉस्पिटल होणे महत्वाचे आहे. परंतु या कामात काही अडथळे आणले जात होते. ते अडथळे दूर करण्यासाठी आम्ही तेथील जागेची मागणी केली होती. परंतु आता प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच आराखडा ठेऊन कामास सुरवात केली. त्याबद्दल प्रशासनाचे आम्ही अभिनंदन य अशी प्रतिक्रिया मधुकर म्हसे यांनी दिली.

निवालृसस्थाने वाचली

निवासस्थाने वाचली आयुष हॉस्पिटलचा आराखडा बदललून कामास सुरवात झाली असती तर दोन निवासस्थाने पाडली गेली असती. परंतु पूर्वी प्रमाणेच आराखड्यानुसार कामास सुरवात झालेली आहे. त्यामुळे निवासस्थाने जैसे थे राहणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com