जनावरांची सदृढ पैदास होण्यासाठी कृत्रिम रेतन केंद्राची सुरवात 

चंद्रकांत देवकते
रविवार, 20 मे 2018

जागतिक पशुसंवर्धन दिनानिमीत्त पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १ शिरापूर(सो) व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने भांबेवाडी येथे रविवार (ता.20) रोजी पशुरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाई व म्हैस यांची सदृढ व निरोगी पैदास होण्यासाठी ऊरळी कांचन जि. पुणे येथील बायफ यासंस्थेच्या वतीने गोधन विकास कृत्रिम रेतन केंद्राची सुरवात करण्यात आली. फक्त ४१ रूपयांमध्ये दर्जेदार कृत्रिम रेतन घरपोच देण्याची सुविधा यामाध्यमातून देण्यात येणार आहे.
 

मोहोळ (सोलापूर) - जागतिक पशुसंवर्धन दिनानिमीत्त पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १ शिरापूर(सो) व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने भांबेवाडी येथे रविवार (ता.20) रोजी पशुरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाई व म्हैस यांची सदृढ व निरोगी पैदास होण्यासाठी ऊरळी कांचन जि. पुणे येथील बायफ यासंस्थेच्या वतीने गोधन विकास कृत्रिम रेतन केंद्राची सुरवात करण्यात आली. फक्त ४१ रूपयांमध्ये दर्जेदार कृत्रिम रेतन घरपोच देण्याची सुविधा यामाध्यमातून देण्यात येणार आहे.

जागतिक पशुसंवर्धन दिनानिमित्त भांबेवाडी येथे पशुरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात कत्रिम रेतन केंद्राचे उदघाटन पंचायत समिती सदस्य रामराजे कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी केशव वाघचवरे होते.

भांबेवाडीसह लांबोटी, आष्टे, कोळेगांव या गावातील पशुपालक शेतकऱ्यास या केंद्राचा लाभ घेता येईल. यांचा श्रीगणेशा पशुपालक शेतकरी दत्तात्रय वाघचवरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आला. यावेळी पं .सं.सदस्य रामराजे कदम, सरपंच केशव वाघचवरे, माधव पाटील, दशरथ वाघचवरे,संजय देशमुख आदी उपस्थित होते. या शिबीरामध्ये जनावरांना जंतनिर्मुलन, गोचीड निर्मूलन, वंधत्व निवारण, औषधापचार, कृत्रीम रेतन, गर्भतपासणी आदीची माहिती सांगुन उपचार करण्यात आले. या शिबीरासाठी पशुधन पर्यवेक्षक डॉ. ढेकळे यु .पी, बायफचे क्षेत्र पर्यवेक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ डॉ. विजय वाघमोडे, यांनी परिश्रम घेतले.

Web Title: started artificial insemination center for breeding of animals