मोहोळ - श्री क्षेत्र नागनाथांची यात्रा आजपासून सुरू

चंद्रकांत देवकते
सोमवार, 16 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथांची यात्रा आज चैत्र वैद्य अमावस्या सोमवार (ता. १६) पासुन सकाळी श्रीस तेल लावण्याच्या कार्यक्रमाने सुरवात झाली. मोहोळचे ग्रामदैवत असलेले श्री नागनाथ महाराज हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार मानले जातात.

मोहोळ (सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथांची यात्रा आज चैत्र वैद्य अमावस्या सोमवार (ता. १६) पासुन सकाळी श्रीस तेल लावण्याच्या कार्यक्रमाने सुरवात झाली. मोहोळचे ग्रामदैवत असलेले श्री नागनाथ महाराज हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार मानले जातात.

सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणुन या यात्रेकडे पाहिले जाते. हिंदु मुस्लीमांसह सर्व जातीधर्माच्या लहान सहान सेवेकऱ्यांच्या कार्यातुन सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणुन ही यात्रा ओळखली जाते. नागनाथाचे मानकरी व नागेश भक्त हेग्रसाचे वंशज अरुणबुवा मोहोळकर, ज्यांच्या शरीरामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर वायुरूपाने प्रवेश करतात अशी श्रद्धा नागेश भक्त ठेवतात ते राजेंद्र  खर्गे महाराज, यांच्यासह कुर्डे, शेटे, वाले, बारगजे, गावडे, सोनटक्के आदि सह सर्व मानकऱ्याच्या उपस्थितीत  आज श्रीस तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.   

१६ एप्रील ते २५ एप्रिलपर्यंत होणारी ही  यात्रा भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी नागनाथ देवस्थान पंच कमेटी सह नागेश भक्त प्रयत्न शिल असुन या यात्रेमुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाले असुन सर्वत्र, ना चिंता ना भय |  नागनाथ महाराज कि जय I असा जयघोष दिसुन येत आहे.                                                

यात्रा शांततेत व व्यवस्थीत होण्यासाठी मार्गदर्शक भाऊसाहेब देशमुख (दादा), पद्माकर देशमुख यांच्यासह देवस्थान पंच कमेटीचे अध्यक्ष सुरेश घोंगडे, उपाध्यक्ष नारायण काळे, सचीव राजेंद्र कुर्डे, सुर्यकांत कांचन, दिलीप देशपांडे, गोविंद घागरे, वसंत काकडे, अभिनंदन गुमते, प्रकाश देशमुख, रामचंद्र परिट, सयाजीराव देशमूख, विष्णु गायकवाड, सतीश  गरड, करिम बागवान ओंकार देशमुख, उल्हास वाले, प्रशांत  गायकवाड यांच्यासह नागेश भक्तगण प्रयत्नशिल आहेत.

सीसीटीव्हीच्या माध्यमातुन यात्रेवर लक्ष

येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कायदा व सुव्यवस्थेचे महत्व पंच कमेठीला सांगत सुमारे १ लाखा पेक्षा जास्त भावीक येणाऱ्या या यात्रेत सीसीटीव्ही ची आवश्यकता मागील वर्षी व्यक्त केली होती . त्यास पंचकमेटीने प्रतिसाद देत यावर्षी कॅमेरे बसविल्या चोरी, हुल्लडबाजी, अशा अनेक बाबीवर निंयत्रण ठेवता येणार आहे. यासाठी पोलीस नाईक निलेश देशमुख, विलास रणदिवे, मुन्ना बाबर, विशाल गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत.

Web Title: starting a nagnath yatra from today