'राज्य आयोग महिलांचे दुसरे माहेर'

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 18 जुलै 2019

"महिला राज्य आयोग हे महिलांचे हक्काचे दुसरे माहेर आहे. संकटे आणि अडचणींतून मार्ग काढण्यासाठी सेतूचे काम करते. महिलांच्या हक्क आणि संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. मात्र त्यांबाबत जागृती आणि जाणीव होणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.

कर्जत (जि. नगर) - "महिला राज्य आयोग हे महिलांचे हक्काचे दुसरे माहेर आहे. संकटे आणि अडचणींतून मार्ग काढण्यासाठी सेतूचे काम करते. महिलांच्या हक्क आणि संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. मात्र त्यांबाबत जागृती आणि जाणीव होणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.

राज्य महिला आयोग आणि राज्य सरकारच्या प्रज्वला योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या विद्यमाने महिला बचत गट प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. पालकमंत्री राम शिंदे, सदस्यत्व नोंदणीचे जिल्हाप्रमुख प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते. महिला बचत गट उत्पादने, शेतीसह विविध प्रकारांत अग्रेसर आहेत. मात्र उत्पादित केलेले पदार्थ किंवा वस्तू "जेथे पिकते तेथे विकत नाही' या उक्तीप्रमाणे योग्य दरात विकल्या जात नाहीत. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम राज्य महिला आयोगाच्या सहकार्यातून प्रज्ज्वला योजनेत केले जाईल, असे आश्‍वासन रहाटकर यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Commission Women Vijaya Rahatkar