esakal | ब्रेकिंग : इस्लामपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक लाचलूचपतच्या जाळ्यात

बोलून बातमी शोधा

state excise department inspector found in larcenist rupees 15 thousand in islampur sangli

जिल्ह्यातील वर्ग 2 चा अधिकारी सापडण्याची ही दुसरी कारवाई असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग : इस्लामपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक लाचलूचपतच्या जाळ्यात

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील वर्ग २ चे निरीक्षक शहाजी आबा पाटील (वय ५६) याला पोलिसांनी आज रंगेहात पकडले. गेल्या चार वर्षांत प्रथमच ही कारवाई झाली आहे. जिल्ह्यातील वर्ग 2 चा अधिकारी सापडण्याची ही दुसरी कारवाई असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. परमिटरूम बिअरबार चालकाने दिलेल्या तक्रारींवरून ही कारवाई झाली. त्या बिअरबार चालकाने त्याच्या परमिटरूम बिअरबारच्या लायसन्स रिनीव करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या चालकाने सोमवारी (५) अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला तक्रारअर्ज दिला होता. त्याच्या तक्रारीनुसार दिनांक सोमवारी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक शहाजी पाटील याने परमिटरूम बिअरबारचे लायसन्स रिनीव करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज (६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या उत्पादन शुल्क कार्यालयात सापळा लावला. त्यात शहाजी आबा पाटील याला लाचेची मागणी करून १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. शहाजी पाटील याच्याविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा - सांगलीत मिनी लॉकडाऊनचा फज्जा; शासनाचे आदेश धाब्यावर, बाजारपेठ सुरू
 

पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, भास्कर भोरे, रविंद्र धुमाळ, राधिका माने, सिमा माने, यांनी कारवाईत सहभाग घेतला. लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.