राज्य सरकार घेणार पवारांचे मार्गदर्शन 

The state government will take Pawars guidance
The state government will take Pawars guidance

नगर : ग्रामविकास विभागाच्या योजनांची राज्यभर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकार आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहे. मुंबईत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी काल (सोमवारी) या विषयावर पवार यांची प्राथमिक चर्चा झाली. त्यात येत्या 18 मार्चला पुन्हा खास बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्र सरकारतर्फे "पद्मश्री' जाहीर झाल्याबद्दल मुश्रीफ यांनी पवार यांचा मुंबईत आमदार निवासात सत्कार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित होते. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांच्या समवेत पवार यांनी ग्रामविकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष काम केले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणखी कोणत्या योजनांची नव्याने आखणी करता येईल, या संदर्भात पवार यांनी मुश्रीफ यांच्यासमोर भूमिका मांडली. 

मुश्रीफ यांच्या मतदारसंघात सरपंच परिषद

काही भावलेल्या योजनांवर पुन्हा सविस्तर चर्चा करण्यासाठी मुश्रीफ यांनी खास बैठक बोलाविण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात ही बैठक होणार आहे. मुश्रीफ यांच्या मतदारसंघात सरपंच परिषद भरविण्यात येणार असून, त्याचे निमंत्रणही पवार यांनी या वेळी स्वीकारले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com