अक्कलकोटला राज्यस्तरीय वटवृक्ष कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

exibition
exibition

अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत महिती दिली आहे. या वटवृक्ष कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ हे अक्कलकोट येथे ता.१६ ते १९ जून या कालावधीत एवन चौकातील राजे फत्तेसिंह क्रीडांगण येथे दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातील मोठे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपन्न होणार आहे. 

यावेळी मान्यवरांनी या प्रदर्शनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या पत्रकार परिषदेस साहेबराव बेंदगुडे, राम फडतरे,परमेश्वर वाघमोडे, पांडुरंग जाधव,सागर बारावकर, दत्तात्रय येळे, रामचंद्र गद्दी, अशीत शहा, सिद्धाराम बामणे, चंद्रकांत हिळ्ळी, शिवराज स्वामी, अजयकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी उभारण्यात येत असलेल्या मंडपाचे पूजन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी केले. यावेळी शरण काडादी, मल्लिकार्जुन पाटील, महेश इंगळे, बब्रुवाहन माने देशमुख, मल्लिकार्जुन काटगाव,गफूर शेरीकर, विलास गव्हाणे, आप्पासाहेब पाटील, काशीराया पाटील, उमेश पाटील, सद्दाम शेरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रदर्शनातील महत्त्वाच्या बाबी 

  • या प्रदर्शनात २६० हुन अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग 
  • शेतीविषयक प्रक्रिया उद्योग
  • महाराष्ट्र शासन कृषी विभाग्याच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने
  •  पशु पक्षी प्रदर्शन 
  • दुर्मिळ देशी ५०० हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री 
  • तांदूळ महोत्सव
  • परदेशी भाजीपाला प्रदर्शन 
  • शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन
  • लाखाहून अधिक शेतकरी बांधवांची प्रदर्शनास भेट
  • तज्ञ मान्यवरांची व्याख्याने
  • नवीन तंत्रज्ञान
  • पिक स्पर्धा
  • राजधानी कृषी पुरस्कार
  • सौर ऊर्जा विषयक दालने
  • जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १०० व ८ इंच लांबीची लोम्बी कुदरत १७ ही देशी बियाणे आदीचे माहिती 
  • सेंद्रीय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने
  • गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहीती - शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल व बियाणे विक्रीसाठी मोफत स्टॉल
  • जगातील सर्वांत लांब १ फूट लांबीची देशी मिरची, फळे व फुले प्रदर्शन व स्पर्धा
  • गाई ,म्हैशी व बैल प्रदर्शन व स्पर्धा तसेच देशी गायीच्या गोमूत्रा पासून २० रुपयांपासून २० हजार रुपये प्रति लिटर पर्यंतच्या घरच्या घरी औषध बनविण्याची प्रक्रिया उद्योगाची माहिती
  • शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन आदी बाबींचा या कृषी प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com