सरपंचांची जिल्हास्तरीय कार्यशाळा; सोलापूर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

सरपंचांची जिल्हास्तरीय कार्यशाळा; सोलापूर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

सोलापूर : सोलापूरचा विकास करण्यासाठी संगठन, मार्गदर्शन आणि कृतिशील आराखड्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येत्या सहा सप्टेंबरला जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे ही कार्यशाळा सकाळी अकरा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 

जिल्ह्यात अनेक गावांनी केलेली विकासकामे, पथदर्शी विकास मॉडेल, ग्रामीण विकासाच्या समस्या आणि उपाय, ग्रामीण रोजगार आदी विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. या वेळी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल. सोलापूर सोशल फाउंडेशन मेक इन गाव, कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटन, सोलापूर महोत्सव आणि गावाशी नाळ जुळलेल्या व बाहेरगावी, शहरात, राज्यात अथवा परदेशात स्थायिक झालेल्या मूळच्या जिल्ह्यातील रहिवाशांना गावाच्या, तालुक्‍याच्या, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देत आहे. असे विविध विषय घेऊन विकास होण्याच्यादृष्टीने काम करीत आहे. याबाबत कार्यशाळेत माहिती दिली जाईल.

ही कार्यशाळा मोफत असून जिल्ह्यातील सर्वच सरपंचांनी सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले यांनी केले आहे. सरपंचांनी 0217-2735539 तसेच 9403482484, 8983496266 या संपर्क क्रमांकांवर नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com