मसूर बस स्थानकाचे वेळापत्रक काेलमडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कऱ्हाड बस स्थानकातील अधिकारी कुलदीप डुबल यांनी उद्यापासून (सोमवार) सहा फेऱ्या वाढविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

मसूर : येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेळेत न येणाऱ्या बसमुळे व जादा बसेस सोडण्यासाठीच्या मागणीसाठी बस स्थानक परिसरात आज बस थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

कऱ्हाड बस स्थानकातील अधिकारी कुलदीप डुबल यांनी उद्यापासून (सोमवार) सहा फेऱ्या वाढविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 
कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून विद्यार्थ्यांनी शांततेत आपल्या मागण्या मांडल्या. बस वेळेत न येणे, बसची संख्या कमी असणे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील तास बुडून शैक्षणिक नुकसान होत आहे. तर परत मसूरला येताना बस वेळेत मिळत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना समस्यांना तोंड द्यावे लागते.

त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना बस स्थानकात बस थांबवून दुसऱ्यांदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. अखेर सोमवारपासून सहा जादा बस सोडण्याचे आश्वासन आगारप्रमुखांनी दिले आहे. आंदोलनावेळी नागरिकांनीही सहभाग दर्शवला. पोलिसांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली. 

सामाजिक कार्यकर्ते गोल्डन पवार, प्रकाश जाधव, सुनील दळवी, राम पार्लेकर, अक्षय जाधव, अकिब पटेल, सोमनाथ चिकणे, प्रतीक दळवी, प्रतीक संकपाळ, अनुराग हुबाले, ऋतुराज माने, सार्थक शहा, तन्मय बर्गे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State transport bus service time table collapased in masur