राज्यात नवीन ४८ महाविद्यालये सुरू होणार

शीतलकुमार - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सोलापूर - राज्यामध्ये नवीन ४८ महाविद्यालये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) सुरू होणार आहेत. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत चार नव्या महाविद्यालयांचा समावेश असून, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर त्यास मान्यता दिली आहे. 

सोलापूर - राज्यामध्ये नवीन ४८ महाविद्यालये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) सुरू होणार आहेत. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत चार नव्या महाविद्यालयांचा समावेश असून, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर त्यास मान्यता दिली आहे. 

राज्यात मुंबई विद्यापीठास सर्वाधिक १८ तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ७ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. शासनाने विद्यापीठाकडून महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत्‌ आराखडा मागविला होता. शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांनी २०१६-१७ या वर्षासाठी नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सदर करण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. पात्र ठरलेल्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. नव्या महाविद्यालयांना मान्यता देताना भविष्यात कोणत्याही प्रकारची अनुदानाची मान्यता करणार नाही. या आशयाचे हमीपत्र महाविद्यालयांकडून घेण्यात येणार आहे. असे हमीपत्र महाविद्यालये जोपर्यंत सादर करणार नाहीत, तसेच विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त०  झाल्या शिवाय विद्यापीठांनी संलग्नीकरण करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. यासोबतच मंजूर करण्यात आलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत अशा सूचना नव्या महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

नवी महाविद्यालये

मुंबई विद्यापीठ १८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ५, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ७, सोलापूर विद्यापीठ १, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड  ३, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ४, एसएनडीटी महिला विद्यापीठ ४, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर ३, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती २, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १.

Web Title: In state will start a new 48 colleges