म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावात ठिय्या आंदोलन

हुकूम  मुलाणी
रविवार, 2 डिसेंबर 2018

मंगळवेढा :  म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावात जि.प सदस्या शैला गोडसे यांचे ठिय्या आंदोलन 6 डिसेंबरला घोलेश्वर ओढ्यामार्गे शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचे लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित केले आहे. समन्वयक शिवाजी सावंत यांनी अधिकारी व आंदोलनकात समन्वयाकाची भूमिका घेतली.

मंगळवेढा :  म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावात जि.प सदस्या शैला गोडसे यांचे ठिय्या आंदोलन 6 डिसेंबरला घोलेश्वर ओढ्यामार्गे शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचे लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित केले आहे. समन्वयक शिवाजी सावंत यांनी अधिकारी व आंदोलनकात समन्वयाकाची भूमिका घेतली.

आंदोलनाच्या सहाव्या दिवशी अधिक्षक अभियंता हनुमंत गुणाले आंदोलनस्थळी भेट घेत सध्या पाणी सोडण्याबाबतच्या अडचणी सांगीतल्या पाणी येणाच्या मार्गातील घोलेश्वरच्या नाल्यातील काटेरी झुडपे, दगडे साठले यामुळे पाणी पुढे जाण्यास अडथळा होत असल्याचे सांगताच समन्वयक शिवाजी सावंत यांनी भैरवनाथ शुगरतर्फे नाला स्वच्छतेसाठी एक जेसीबी मशिन देण्याचे जाहीर केले. या मशिनद्वारे स्वच्छता केल्यास नाल्याची स्वच्छता, खोलीकरण, रूंदीकरण झाल्याने वेळेत पाणी येणार आहे. त्यांच्या पुढाकाराचे शेतकऱ्य़ांनी स्वागत केले. पाच दिवसातील आंदोलनात आ. तानाजी सावंत, समन्वयक शिवाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, गणेश वानकर आदींनी आंदोलनकर्त्यांच्या मागे उभे राहिल्याने जलसपंदा मंत्र्याच्या आदेशामुळे महसूल व पाटबंधारे खात्याचे विविध अधिकाऱ्य़ांसह म्हैसाळचे अधिक्षक अभियंता गुणाले यांनी शैला गोडसे व आंदोलनकर्त्याशी आंदोलनस्थळी चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष येताळा भगत, महेश साठे, रवि मुळे, बंडू घोडके, अंकुश खताळ बंडू गडदे, आबा खांडेकर, नामदेव मेडीदार, संतोष बिराजदार, उत्तम चोपडे, शहाजी सुरवसे, आनंदा बडगर, विजय कलुबर्मे, सुभाष पाटील, नारायण गोवे, सुरेश नरळे, शंकर भगरे, एकनाथ नवञे या भागातील सर्व शेतकरी महिला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

''म्हैसाळच्या पाण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्षा केली. मात्र खोटी आश्‍वासनाने शेतकय्रांला फसविले म्हणूनच सहा दिवस थंडीचा विचार न करता शेतकऱ्यांसह मोठ्या हिंमतीने ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे का होईना अधिकाऱ्य़ांना तलावात येऊन लेखी आश्‍वासन दिले. पण, हे आश्वासन खोटे ठरल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारून या परिसरातील शेतकऱ्यांना हक्काच्या पाणी मिळवून देणार आहे.''
- शैला गोडसे, जि. प. सदस्या

''पाणी वेळेत देण्यासाठी जलसेतूचे काम नियोजन वेळेपुर्वी काम केले. दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यातही पाण्याची मागणी जास्त आहे. दोन तीन ठिकाणी कालवा फोडण्याच्या घटनाने विलंब झाला तरीही दिलेल्या वेळेत पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचे कार्यालय जरी सांगलीला असे तरी आम्ही पाणी सोडण्याबाबत भेदभाव करणार नाही. त्यामुळे या भागाला पाणी दिल्यामुळे आम्हाला आनंद होणार आहे.'' 
- हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग सांगली.

Web Title: Static agitation for Mhaisal water in Shiranandgi lake