डॅा. कोटणीसांचे स्मारक प्रेरणास्थळ : फडणवीस

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 5 जुलै 2018

सोलापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांचे सोलापुरातील स्मारक हे केवळ सोलापूर शहर, राज्यासाठी नाही तर देशवासियांसाठी प्रेरणास्थळ आहे. असे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॅा. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

सोलापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांचे सोलापुरातील स्मारक हे केवळ सोलापूर शहर, राज्यासाठी नाही तर देशवासियांसाठी प्रेरणास्थळ आहे. असे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॅा. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

डॅा. फडणवीस यांनी गुरुवारी स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, डॅा. कोटणीस यांचे नाव व त्यांचे कार्य एकले होते. आज स्मारकाला प्रत्यक्षात भेट देण्याची संधी मिळाली. त्यांनी केलेल्या कामाची आणखी माहिती या ठिकाणी मिळाली आणि ते एकल्यावर खूप अभिमान वाटला. सोलापूरमध्ये इतका मोठा व्यक्ती झाला आणि त्याने आपले नाव जगामध्ये केले. त्यामुळे हे सर्वांसाठीचे प्रेरणास्थळ आहे. मानवतावादी दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा आदर्श आजच्या विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यापासून घेतला पाहिजे. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून भगिनी शहरे कराराचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. दोन्ही देशातील नागरिकांना एकेमेकांना समजून घेणे, संस्कृतीचे आदान-प्रदान करणे यासाठी प्रयत्न केले जातील. या ठिकाणी सुरु असलेल्या चीनी भाषा वर्गाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांसाठी काही करता आले तर निश्चितच त्यासाठी पाठपुरावा करू, असेही डॅा. फडणवीस म्हणाल्या. वर्गाचे चालक रमेश मोहिते यांनी स्वागत केले. यावेळी सुखदा मोरे, स्नेहल खोत, अपर्णा घाळे, वर्षा घाळे, श्रीधर नागणे, कमलेश पाटील, आरीफ शेख, आयुष मेने, स्वराज देशमाने, डॅा. शीतलकुमार शहा व अमित शहा उपस्थित होते.

Web Title: Statue of Kotanias Inspiration: Fadnavis