चालकाने कारमधून धनादेश चोरले, बॅंकेत जाऊन पैसे काढले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर : कारचालक व त्याच्या साथीदाराने सह्या केलेल्या कोऱ्या धनादेशाद्वारे बॅंकेतून 30 हजार काढून फसवणूक केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बाळू वसंतराव डोईजोडे व शकील अल्लाबक्ष नदाफ अशी त्यांची नावे आहेत. येथील विजापूर रस्त्यावरील बियाणे आणि खत विक्रेते विवेक श्रीमंत म्हेत्रे (वय 26, रा. वैष्णवीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

डोईजोडे हा म्हेत्रे यांच्याकडे कारचालक आहे, तर नदाफ हा त्याचा साथीदार आहे. त्यांनी कारमधील सह्या केलेले कोरे धनादेश चोरले. त्यातील एक धनादेश बॅंकेत नेऊन वटवला व जुळे सोलापुरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील खात्यातून 30 हजार काढून फसवणूक केली. नदाफने डोईजोडे यांच्याशी संगनमत करून कारमध्ये ठेवलेले धनादेश चोरले. बॅंक खात्यातून पैसे काढल्याचा एसएमएस म्हेत्रे यांना आला. त्यानंतर त्यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली. 

म्हेत्रे यांनी सह्या करून धनादेश कारमध्ये ठेवले होते. कारचालकाशी संगनमत करून नदाफ याने धनादेश चोरून बॅंकेत वटविले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तीन कोरे धनादेश चोरले आहेत. एक धनादेश वटवला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. 
- संजीव भोसले, 
सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: steal cheques from car and collect money from bank