नागरीकांच्या सतर्कतेने चोरांची पळता भुई थोडी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

सोमवार पेठेतील पंताचा कोट परिसरात चार चोरट्यांनी धुडगूस घातला. त्या भागातील नागरीक जागे झाल्याने चोरांच्या टोळीने नदीच्या दिशने पलायन केले.

कऱ्हाड - गल्लीत चोर आल्याची माहिती मोबाईलवरून एकमेकांना देत नागरीक एकत्रित जमले. त्यांनी धाडसाने त्यांचा मुकाबला केल्याने चोरट्यांना पलायन करावे लागले. काही महिलांनीही चोरट्याशी दोन हात केले. अडचणीत येताच चौघा चोरट्यांनी अंगातील जॅकेट टाकून पलायन केले. सोमवार पेठेतील पंताच्या कोट येथे काल रात्री घटना घडली. 

येथील सोमवार पेठेतील पंताचा कोट परिसरात चार चोरट्यांनी धुडगूस घातला. त्या भागातील नागरीक जागे झाल्याने चोरांच्या टोळीने नदीच्या दिशने पलायन केले. काल रात्री उशिरा ही घटना घडली. नागरीकांच्या भितीने पळालेल्या चोरांनी त्यांचे जॅकेट तेथच टाकून पोबारा केल्याने त्याची शहरात चर्चा होती. 

येथील सोमवार पेठेतील पंताचा कोट परिसर आहे. नदीच्या बाजूने येण्यास प्रितीसंगम बागेतून रस्ता आहे. त्याच रस्त्याने आलेल्या चोरट्यांनी पेंढरकर वाडा व त्या भागातील घरात हातसफाईचा प्रयत्न केला. मात्र जागरूक झालेल्या त्या भागातील नागरीकांमुळे तो प्रसंग टळला. त्या चोरट्यांनी कॅफे समोरील घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. घरात असलेल्या युवतील त्याची चाहूल लागली. तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उघडला नाही. त्यावेळी तीने आजूबाजूच्या शेजाऱ्यांना मोबाईलवर काॅल करून त्याबाबत माहिती दिली. त्यावेळी शेजारचे नागरीक जागे झाले. ते हातात काठ्या घेवून बाहेर आले. त्यावेळी घराभोवती फिरणारे चार संशयीत त्यांना दिसले. त्यामुळे त्या लोकांनी ओरडून आणखी काही लोकांना जाग केले. एका युवकाने काठी मारून संशयीताला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधराचा फायदा घेवून संशयीत पळून गेला. त्याचे अन्य साथीदारही बाग व नदीच्या दिशेने पळाले. त्यावेळी त्यातील एका तेथेच जॅकेट टाकून पळ काढला. नागरीकांनी ते जॅकेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Stolen at Somvar Peth Karhad

टॅग्स