जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

सुनील गर्जे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पोलिस कॉन्स्टेबल वासिम इनामदार यांची फिर्‍यादिवरून नेवासे पोलिसांत बाळकृष्ण शिवाजी गडेकर, किशोर सुदाम काळे दोघेही राहणार रामडोह ता. नेवासे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासे : अवैध चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासे पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना जुगार्‍यांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर दगडे फिरकावली. त्यात एक कर्मचारी जखमी झाला.  ही घटना सोमवार (ता. 6) रोजी रात्री साडेआकरा वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील रामडोह येथे घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

पोलिस कॉन्स्टेबल वासिम मुस्तफा इनामदार (वय 27) व पोलिस कॉन्स्टेबल गणेश गलधर असे धक्काबुक्की व दगड फेकीत जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नावे आहेत. खबर्‍या मार्फत मिळालेल्या माहिती वरुण वरील दोघा पोलीस कर्मचार्‍यांनी रामडोह येथे एका ठिकाणी चालू असलेला जुगार अड्ड्यावर (पत्त्याचा क्लब) छापा टाकण्यासाठी गेले असता या जुगार्‍यांनी त्यांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर दगड फेक केली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नेवाशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी जखमीची भेट घेवून विचारपूस केली. तसेच घटनास्थळी भेट दिली. 

पोलिस कॉन्स्टेबल वासिम इनामदार यांची फिर्‍यादिवरून नेवासे पोलिसांत बाळकृष्ण शिवाजी गडेकर, किशोर सुदाम काळे दोघेही राहणार रामडोह ता. नेवासे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: stone pelting on police at Newase Nagar