सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात वादळासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुमारे 20-25 मिनिटे झालेल्या या पावसात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुमारे 20-25 मिनिटे झालेल्या या पावसात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

वाऱ्याच्या या तडाख्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्या निवासस्थानातील एक झाडही कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. बार्शी तालुक्‍यातील चारे परिसरात रविवारी (ता.7) गारपिटीसह पाऊस झाला. आज सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वादळवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. दिवसभर कडाक्‍याचे ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवत असताना, दुपारी वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर व परिसरात वाऱ्यासह पावसाने काही काळ हजेरी लावली; पण पावसापेक्षा वादळवाऱ्याचेच प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावरील अनेक ठिकाणी झाडे पडली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांचे निवासस्थान सोलापुरात गांधीनगर भागात आहे. तेथील एक मोठे झाड कोसळून पडले. सुमारे 20 ते 25 मिनिटांत 9.2 मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली.

Web Title: storm with rain in solapur