Diwali Festival : बांबुच्या आकाश कंदिलाचा इकोफ्रेंडली दिपोत्सव (व्हिडिओ)

story of Sangeeta Wade who made Diwali Lantern
story of Sangeeta Wade who made Diwali Lantern

कोल्हापूर : बांबूच्या काड्या, बांबूचे पेर, त्याला आकर्षक नक्षीकाम व रंगलेपन करून विशिष्ट कोनात केली जाणारी बांधणी आणि त्यातून तयार होणारे रंगीबेरंगी आकाश कंदिल यंदाच्या दिवाळीत रोषणाई विलोभनीय करणार आहेत. त्यासाठी बांबूचे चोवीसपेक्षा जास्त आकाश कंदिल बनविणाऱ्या कणेरकरनगर येथील संगीता वडे यांच्या हाताला विलक्षण गती आली आहे. तीन-चार महिन्यात त्यांनी बनविलेले आकाशकंदिल घरोघरीच्या पर्यावरणपूरक अंगणात दिपोत्सवाचा प्रकाश अधिक लख्ख करणार आहे. 

संगीता वडे या आकाश कंदिल बनविणाऱ्या निष्णात कलावंतापैकी एक आहेत. बांबूपासून अनेकजण आकाश कंदिल बनवतात. परंतु, त्यापासून 24 पेक्षा जास्त आकाराचे आकाशकंदिल बनविण्यात त्यांचा 20 वर्षातील अनुभव हाच आकाश कंदिल भक्कम व तितकाच नाविण्यपुर्ण बनविण्यात त्या माहिर बनल्याचे दिसते. डायमंड, चांदणी, डमरू, स्तंभ, फुल, फुलदाणी आदी प्रकारचे आकाशकंदिल मांडले आहेत.

प्रत्येक आकाशकंदिलाची बांधणी करताना साधलेला कोन बांधणीतील पेरावर केलेले रंगलेपन तसेच कंदिलाला साजेश्‍या रंगातील दोऱ्याने केलेले भक्कम जोडकाम व सजावटीचा भाग म्हणून नक्षीकाम केलेले कापडाचा वापर करून आकाशकंदिल सजविले आहे. अशा नटलेल्या, सजलेल्या आकाशकंदिलाच्या पोकळीत विद्युत बल्ब जोडण्यासाठी जागा आहे. कमीत कमी चार इंचापासून ते दीड दोन फुटाच्या आकाश कंदिलापर्यंत त्यांच्या संग्रही आहेत. त्यांचे हे आकाशकंदिल राज्यात विविध ठिकाणी जातात.



शिवाय, परदेशातही या आकाशकंदिलाला अधिक मागणी आहे. गेल्या वर्षी विविध प्रकारचे 24 आकाशकंदिल ऑस्ट्रेलियात पाठवले होते. यंदा त्यांनी 1500 आकाशकंदिल केले आहेत. 

हे आहेत प्रकार 
डमरू, घंटी, डमरू उलटी टोपी, डमरू डायमंड, तुळशी कट्टा, तुळशी वृंदावन, तबकडी, चौकोन, षटकोन, षटकोन चौकोन, त्रिकोण, मासा, शंकु, चौकोन पाकळी हे फोल्डींगचे आकाशकंदिल आहेत. तर लहान पाकळी, मोठी पाकळी, लहान चांदणी, मोठी चांदणी, बेल लॅंम्प असे विना फोल्डिंगचे आकाशकंदिल त्या बनवितात. यांची किंमत 250 पासून 750 रूपयांपर्यत आहे. 

बुरूडकाम हा आमचा पारंपारिक व्यवसाय. सुरवातीला कापडाचे आकाशकंदिल बनवत होतो. तोच पॅटर्न आम्ही बांबूत वापरला. दरवर्षी 2 नवीन प्रकार यात आणतो. यात माझे पती दिलीप आणि मुलगा विनायक मला मदत करतात. - संगीता वडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com