स्ट्रॉबेरीला रासबेरी, मलबेरीची साथ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पाचगणी  - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीने या भागात वेगळे अस्तित्व निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. काही वर्षांपूर्वी एन्ट्री केलेल्या रेड रासबेरीने "एक्‍झिट' घेतली आहे. ब्रोकोलीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे. 

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान झालेले पाचगणी, महाबळेश्वर म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा खजिना! मलबेरी, रासबेरी, गुजबेरी, तोरणे, आंबोळकी, जांभूळ म्हणजे या भागातील डोंगरीमेवा. जुन्या जातीच्या ऑस्ट्रिया, निग्रो व बंगलोर जातीच्या स्ट्रॉबेरीला बगल देऊन कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरीने या भागात साम्राज्य प्रस्थापित केले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्रास शेतकऱ्यांनी या पिकाकडे मोर्चा वळवला आहे. यावर्षी आकाराने मोठे, चविष्ट, रुचकर असलेल्या या फळाच्या जोडीला ब्लॅक रासबेरी, गुजबेरी, मलबेरी व चेरी टोमॅटो दृष्टीस पडत आहे. स्थानिक बाजारपेठेत स्ट्रॉबेरी 80 रुपये, रासबेरी 300, चेरी टोमॅटो 80 रुपये किलोने विक्री सुरू आहे. अल्पशा प्रमाणात हजेरी लावलेल्या मलबेरीचे दर गगनाला भिडणारे आहेत. रासबेरीचे फळ नाशवंत असल्याने तिचा फ्रूट म्हणून कोणीही स्वीकार केला नसल्याचे महेंद्र पांगारे या प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले. मूळच्या युरोपच्या रेड कॅबेज व ब्रोकोली यांनीही बाजारात ठाण मांडले आहे. दरम्यान, करवंदे, तोरणं, जांभूळ या अन्य रानमेव्यांची प्रतीक्षा असतानाच अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने हजेरी लावल्याने या फळांचे भवितव्य अंधारात आहे. 

Web Title: Strawberrie Black-Raspberr