मनसोक्त स्ट्रॉबेरी खा... तीही फुकट! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

भिलार : थेट शेतातील स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी आज सकाळपासून गर्दी केली होती. त्यामुळे भिलार परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. 

स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशन, 'मालाज्‌', 'मनामा', 'प्युअर बेरी' व शेतकऱ्यांच्या वतीने भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे आजपासून स्ट्रॉबेरी महोत्सव सुरु झाला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी, उद्योजक व शेतकऱ्यांनी स्वागत कमानी, मंडप, ज्यूस, आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स उभारले आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भिलारे म्हणाले, स्ट्रॉबेरी फळाचे महत्त्व देश व परदेशातही पोहोचवी ही संकल्पना घेऊन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवादरम्यान पर्यटकांना तीन दिवस स्ट्रॉबेरीच्या शेतावर जाऊन अगदी फुकट स्ट्रॉबेरीची चव चाखण्याची मजा घेता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. 

भिलार येथे थेट शेतात जाऊन पर्यटकांनी मनसोक्तपणे स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घेतला. मोफत मिळणारी स्ट्रॉबेरी खाण्यासाठी आज सकाळपासूनच भिलार, भोसे परिसरात पर्यटकांची गर्दी होती. या वेळी पर्यटकांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करण्यात आले.

मुंबई, पुणे, नाशिक परराज्याबरोबरच परदेशी पर्यटकांचा महोत्सवातील सहभागही लक्षवेधी दिसत होता. हा प्रयत्न चांगला असून, आम्ही बाजारपेठेतून स्ट्रॉबेरी विकत घेत होतो; परंतु शेतात जाऊन स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद वेगळाच आहे. स्ट्रॉबेरी शेती आम्ही पहिल्यादांच पाहिली असून, हा आनंद खूपच वेगळा आहे, अशी प्रतिक्रीया पर्यटक सुमेध पाटील यांनी दिली.

Web Title: Strawberry festival in Satara district for tourists