निर्बीजीकरण हाच पर्याय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कोल्हापूर - मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यापलीकडे महापालिकेकडे दुसरा कोणताही उपाय नाही, अशा प्रकारे सात वर्षांपूर्वी पाच हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले होते. त्यानंतर मात्र या कामात खंड पडला.  यंदाही आता स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने निर्बीजीकरण केले जाणार आहे. 

कोल्हापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात सुमारे वीस हजारांवर भटकी कुत्री असतील, असा अंदाज आहे. शहराच्या अनेक भागात मोकाट कुत्र्यांच्या टोळक्‍यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे शहराच्या काही विशिष्ट भागातून जाताना भीतीने अंगाचा थरकाप उडविण्यासारखी स्थिती आहे. कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाजवळ 2003 च्या दरम्यान, मोकाट कुत्र्यांनी एका चिमुरडीच्या अंगाचे लचके तोडून तिचा प्राण घेतला होता. त्यानंतर या प्रकरणातून महापालिका व आपण कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्‍नाकडे आजही गांभीर्याने पाहिले जात नाही. विशेषतः शहरातील झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. 

शास्त्रीनगर येथेही काल मोकाट कुत्र्यांनी एका चिमुरडीवर हल्ला चढवून तिला भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यामुळे ताबडतोब चिमुरडीची सुटका केली; पण अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने यावर उपाययोजना करायला हवी. 

महापालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सुरवातीला हे निर्बीजीकरण उचगाव जकात नाक्‍याच्या इमारतीत करावे, असा प्रस्ताव होता. त्यानंतर स्थायी समितीने या जागेऐवजी झूम प्रकल्पालगतच्या जागेतील दोन खोल्यांमध्ये हे निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हे निर्बीजीकरण केंद्र चालविले जाणार आहे. त्याचा कोणताही बोजा महापालिकेवर पडणार नाही. 
- डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक 

Web Title: stray dogs issue