फेरीवाल्यांनी क्‍यूआर कोड काढून घ्यावा...

Street vendors should remove the QR code ...
Street vendors should remove the QR code ...

सांगली : पंतप्रधान स्वनिधीच्या कर्जासाठी प्रकरणे मंजूर असणाऱ्या सर्व फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडून क्‍यूआर कोडचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व फेरीवाल्यांनी क्‍यूआर कोड काढून घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. क्‍यू आर कोडमुळे फेरीवाल्यांना ग्राहकांशी व्यवहार करणे सुलभ होईल. त्यामुळे रोख पैसे नसले तरी ऑनलाईन बिल देऊन व्यवहार करता येतील. 

शासनाने पीएम स्वनिधीसाठी क्‍यू आर कोड अनिवार्य केले आहे. त्यामुळे पीएम स्व निधीतून कर्ज घेणाऱ्या फेरीवाल्यांसाठी क्‍यू आर कोडची माहिती व्हावी. त्यांना ते वापरता यावे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. मारुती चौकात आयोजित कार्यक्रमात बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी क्‍यू आर कोडबाबत मार्गदर्शन केले. तर पे फोनच्या प्रतिनिधींनी क्‍यूआर कोड कसा काढायचा याचे प्रशिक्षण फेरीवाल्यांना दिले. यावेळी पीएम स्व निधीतून मंजूर असणाऱ्या फेरीवाल्यांच्या कर्जाच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. 

उपायुक्त पाटील, नगरसेवक सुबराव मद्रासी, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, युवा नेते पृथ्वीराज पवार, जिल्हा अग्रणी बॅंक सहायक व्यवस्थापक अनंत बेळगे, बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक निखिल सावळे, फोन पेचे मुदस्सर मगदूम, फेरीवाला समितीचे सदस्य रेखा पाटील, सुरेश टेंगले, सिंधुताई शिंदे, अर्चना ऐनापुरे यांच्यासह महापालिका राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानचे व्यवस्थापक मतीन अमीन, समूव्ह संघटिका वंदना सव्वाखंडे, शाहीन शेख आदी उपस्थित होते.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com