सोलापूर : एमआयडीसीमध्ये 'प्रहार'चा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

एमआयडीसी चिंचोळी येथील सिमको स्पिनर्स कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार न दिल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्यावतीने आज सकाळपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

सोलापूर : एमआयडीसी चिंचोळी येथील सिमको स्पिनर्स कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार न दिल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्यावतीने आज सकाळपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे एमआयडीसीतील अनेक कारखान्यातील कामगार रस्त्यावर थांबून आहेत. कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सोलापुरातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा थकीत पगारही कंपनीने दिलेला नाही असे प्रहार संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू असून पूर्ण एमआयडीसीचे कामकाज बंद झाल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strike in Salapur district