कॉंग्रेसमधील इच्छुकांचे सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन

congress.jpg
congress.jpg

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना आज प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात येणारे समर्थक कार्यकर्ते आणि भाडोत्री जमाव असा सारा माहोल होता. उमेदवारीसाठी नेत्यांसमोर मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन सुरु होते. लाऊड स्पिकरवरून कार्यकर्ते मनोगत व्यक्त करीत होते आणि नेते मंडळी निवांतपणे त्यांचे कथन ऐकत होते. येथील राम मंदिर चौकातील कच्छी भवनातील आज सारा लवाजमा कॉंग्रेसच्या शक्तीप्रदर्शनाचा भाग होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांसमोर मुलाखती सुरु आहेत. 

सकाळी नऊपासूनच विविध प्रभागातून कार्यकर्ते येत होते. आपणास उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येकाने कार्यकर्ते, मतदारांना मोठ्या संख्येने जमवण्याचा प्रयत्न चालवला होता. मुलाखत स्थळी लोक आणण्यासाठी चारचाकी वाहनांची केली सोय आहे. विश्‍वासातील जवळच्या कार्यकर्त्यांवर माणसांची "व्यवस्था' करण्याची जबाबदारी सोपवली होती. 'ते' लोकही नेत्याचा जयघोष करीत येत होते. मुलाखत झाली की पुन्हा दुसऱ्या नेत्यासाठी थोडे दूर जावून मिरवणुकीत सहभागी होत पुन्हा येत होते. मुलाखतींसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री सतेज पाटील, प्रदेश निरीक्षक अभय छाजेड, जिल्ह्याचे कॉंग्रेस प्रभारी प्रकाश सातपुते यांच्याकडे मुलाखतींची जबाबदारी आहे.

जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, नेत्या जयश्री पाटील याही मुलाखती घेतली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मुख्य समन्वयक आहेत. सांगलीतील प्रभाग 10 ते 19 आणि प्रभाग 1 आणि 8 च्या मुलाखती सकाळी नऊपासून सुरू होतील. उद्यापासून मिरजेतील मुलाखती पटवर्धन हॉल येथे सकाळी नऊपासून सुरू होतील असे श्री पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com