एक हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मलवडी - उज्ज्वल निकालाची परंपरा असलेल्या माण तालुक्‍यातील इयत्ता दहावीत तीन हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मलवडी - उज्ज्वल निकालाची परंपरा असलेल्या माण तालुक्‍यातील इयत्ता दहावीत तीन हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माण तालुक्‍याचा दहावीचा निकाल ९६ टक्के लागला आहे. एकूण ६५ विद्यालयांतील तीन हजार २०० विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळाले आहेत. काही अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी तालुक्‍यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेतात; पण उत्तीर्ण विद्यार्थी संख्या व कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध जागांत मोठी तफावत दिसते. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया किचकट झाली असून, अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

माणमध्ये दहिवडीत, महिमानगड, बिदाल, देवापूर, म्हसवड, मलवडी, राणंद, मोही, दिवड, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, भालवडी याठिकाणी एकूण १४ कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या सर्व ठिकाणी एक हजार ८४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी एक हजार १६० प्रवेश अनुदानित आहेत, तर ६८० विनाअनुदानित आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी एक हजार ३६० विद्यार्थी प्रवेशाशिवाय वंचित राहण्याची शक्‍यता आहे. यातील काही विद्यार्थी इतरत्र शिक्षणासाठी जाण्याची शक्‍यता असली, तरी दहिवडी, देवापूर याठिकाणी बाहेरील तालुक्‍यातून शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा मोठा ताण विशेषतः दहिवडी कॉलेज, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजवर दिसत आहे. वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन दहिवडी कॉलेजने एप्रिलमध्येच विना अनुदानित तुकडीची मागणी केली आहे. अद्यापपर्यंत सदर तुकडीस मान्यता मिळालेली नाही.

Web Title: student admission issue