देशविरोधी घोषणा देणे "त्या' तीन विद्यार्थ्यांना पडले चांगलेच महागात  

student anti national declaration in belgaum
student anti national declaration in belgaum

बेळगाव : हुबळी येथे देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी हिंडलगा कारागृहात रवानगी केलेल्या "त्या' तिघा संशयित विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. 25) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांची दुपारी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संशयितावर हल्ला होईल या भीतीने जिल्हा रुग्णालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

बसित आसीक सोफी (वय 19, रा. सीमपुरा ता. सोपुरे जि. बारामुल्ला जम्मू-काश्‍मीर), तालीब मजीद अब्दुलमजीद वाणी (वय 19, रा. क्रांडीगम ता. बिजबेरहा जि. अनंतनाग, जम्मू-काश्‍मीर) आणि अमीर मोहिउद्दीन वाणी गुलाम मोहिद्दीन वाणी (वय 23, रा. बटकोट ता. पहलगाम जि. अनंतपूर जम्मू-काश्‍मीर) अशी त्यांची नावे आहेत. 

पुलवामा घटनेच्या वर्षपूर्तीप्रसंगी 24 फेब्रुवारीस तालिब, अमीर आणि बसित या युवकांनी हुबळी येथे देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. यानंतर या घटनेचा व्हिडोओही व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर हुबळी ग्रामीण पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली. मात्र, या तीनही विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीबाबत विविध संघटनांनी जोरदार आवाज उठविल्यामुळे त्यांना पुन्हा अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हे नोंद प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने त्यांना हुबळी पोलिसांनी पोलिस कोठडीत घेतले. मात्र, तत्पूर्वी त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीप्रसंगी जिल्हा रुग्णालयाला पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com