विद्यार्थ्यांच्या दाखल्यांतून तिजोरीत भर 

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांतून तिजोरीत भर 

सोलापूर - दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर यांसह इतर दाखले काढण्यासाठी राज्यातील सेतू कार्यालये व महा ई-सेवा केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. 1 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्रात 26 लाख 94 हजार 603 दाखल्यांचे वाटप झाले आहे. यामधून राज्याच्या तिजोरीत 39 कोटी 24 लाख 71 हजार रुपयांची भर पडली आहे. 

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे दाखले घरबसल्या मिळावेत यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू कार्यालयासह महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, संग्राम योजना या माध्यमातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुलभपणे दाखले उपलब्ध करून दिले जात आहेत. महाऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून राज्यातील दाखल्यांची सर्व यंत्रणा एकत्रित करण्यात आली आहे. नॉन क्रिमिलेअर व जातीच्या दाखल्यासाठी 57 रुपये आकारले जातात, तर इतर दाखल्यांसाठी 33 रुपये साठ पैसे आकारले जातात. राज्यात आतापर्यंत वितरित झालेल्या 26 लाख दाखल्यांमधून सरकारला 39 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

राज्यातील चित्र... 
एक लाखाहून अधिक दाखले वाटप केलेले जिल्हे व शासनाला मिळालेला महसूल. माहिती 1 ते 26 जूनपर्यंतची. 
जिल्ह्याचे नाव वाटप दाखल्यांची संख्या मिळवून दिलेला महसूल 
नगर 1,77,229 1,42,97,411 
नाशिक 1,72,194 1,89,08,392 
औरंगाबाद 1,63,827 1,95,99,358 
पुणे 1,40,816 1,46,04,062 
जळगाव 1,31,882 1,17,92,098 
सोलापूर 1,27,197 1,04,55,797 
बुलडाणा 1,08,719 1,50,32,563 
जालना 1,08,080 88,49,628 
कोल्हापूर 1,03,967 1,26,39,251 
अमरावती 1,03,212 1,71,46,532 

राज्यात महा ई-सेवा केंद्र व सेतू समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले देण्याचे काम सुरू आहे. यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध व्हावेत यासाठी गुजरात इन्फोटेकच्यावतीने वाढीव मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. 
- सुदीप सामाले, प्रकल्प व्यवस्थापक, गुजरात इन्फोटेक लि. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com