कऱ्हाडमध्ये नववीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

कऱ्हाडमध्ये नववीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

कऱ्हाड - येथील संत तुकाराम हायस्कुलमधील मुलांच्या वसतीगृहातील नववीच्या विद्यार्थ्याने काल मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. वसतीगृहातच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

कऱ्हाडच्या (जि.सातारा) शुक्रवार पेठेत संत तुकाराम हायस्कुलमध्ये संबंधित मुलगा नववीच्या वर्गात शिकत होता. ते तेथीलच हायस्कुलच्या मुलांच्या वसतीगृहात वास्तव्यास होता. काल मध्यरात्रीनंतर त्याने गफळास घेतला. रात्री संबंधित खोलीतील लाईट सुरु असल्याने अन्य विद्यार्थ्यांना लाईट का सुरु आहे अशी शंका आली. त्याची माहिती त्यांनी चौकीदारांना दिली. त्यांनी संबंधित खोलीतील अन्य विद्यार्थ्यांना उठवुन खोलीची कडी काढायला सांगितली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकीदार माणिक इश्वरा लोंढे यांनी त्याची खबर दिली पोलिसांत दिली आहे. दरम्यान विद्यार्थ्यानेच आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com