विद्यार्थ्यांसाठी ही ‘लाईफ सायकल’च

Cycle-Distribution
Cycle-Distribution

इस्लामपूर - काही किलोमीटरचे अंतर पायी चालून शाळेत जाणाऱ्या, जिद्दीने शिकणाऱ्या, मोठे होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल रुपाने मोठे बळ दिले आहे. ही केवळ सायकल नसून ‘लाईफ सायकल’ आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी काढले. 

‘सकाळ’ आणि जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूरतर्फे आयोजित गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक काकासाहेब चितळे, सर्जेराव यादव, ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सहयोगी संपादक शेखर जोशी, जायंट्‌सचे अध्यक्ष संदीप राठी, कार्यवाह दत्ता  माने प्रमुख उपस्थित होते. ७५ विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली. मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील यशाबद्दल विशेष सत्कार झाला.

श्री. काळम म्हणाले,‘‘इस्लामपुरात माणसातील जिवंतपणाचा अनुभव आला. माणूस अनेक वर्षे जगतो आणि अखेरच्या दिवसांत त्याला जगणे राहूनच गेले,  असे वाटू लागते. त्याचे दुःख होते. ते व्हायचे नसेल तर सामाजिक दृष्टिकोनातून जगा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सुखावतो तोच खरा जगतो. सायकलीतून विद्यार्थ्यांना तो मोठा आधार मिळाला. वस्तूच्या किमतीपेक्षा भावनेला अर्थ आहे. ‘सकाळ’ च्या संकल्पाला माझी मानवंदना.’’

श्री. चितळे म्हणाले,‘‘प्रामाणिक कष्ट, निरपेक्ष सेवा व आनंद वाटणे, असा जायंट्‌सचा संदेश आहे. चांगल्या गोष्टींचे प्रतिबिंब ‘सकाळ’मध्ये नेहमीच दिसते.’’

डॉ. गायकवाड म्हणाले,‘‘अशा उपक्रमातील बंधुभाव शालेय अभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे. संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत सामाजिक जबाबदारी यातून निभावली जातेय. ‘सकाळ’ नेहमी चांगल्याच्या पाठीशी राहिला आहे. गरिबांना जाणण्याची आपली मानसिकता कौतुकास्पद आहे.’’ 
दीपक झिंजाड म्हणाले,‘‘सकाळ समाजोपयोगी  उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपतोय. इथली नगरपालिका ‘सकाळ’ सोबत काम करेल.’’

श्री. जोशी म्हणाले,‘‘केवळ बातम्या न देता त्याला परिमाण देणारी बदलाची व्यवस्था ‘सकाळ’ ने निर्माण केली आहे. दुष्काळमुक्तीसाठी पुढाकार घेतला. सायकलबाबत जिल्ह्यात प्रसार करून ही चळवळ बनवण्याचा प्रयत्न करूया.’’

सायकलदाते प्रा. राजा माळगी, सर्जेराव यादव यांची भाषणे झाली. दुष्यंत राजमाने, गणेश पाटील, राजकुमार ओसवाल, संजय ओसवाल, प्रशांत माळी, गजानन परब, अभय व अमित शहा, रणजित जाधव, नितीन शहा, संपत कोकाटे, अनिल पाटील, छगन कोठारी, नितीन पारेख, गोविंद पोतदार, राजू देसाई, नितीन व प्रवीण फल्ले, सतीश शेटे, रवी सूर्यवंशी, विनायक गुरव, सदानंद  जोशी, मुकेश अग्रवाल, अफजल इबुशे, हर्ष परदेशी, संतोष पेठकर, अवधूत पेठकर, विनायक खरात, कविता शहा, मधू देसावळे, शांताराम पाटील, संग्रामसिंह पाटील, संदीप पाटील, संतोष कागले, महादेव अहिर, धनाजी पाटील, प्रमोद माने, दीपक पवार उपस्थित होते. अध्यक्ष संदीप राठी यांनी स्वागत केले. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. धर्मवीर पाटील यांनी आभार मानले. 

दात्यांचा सत्कार
प्रकाश पाटील, संजीवकुमार साळुंखे, प्रज्ञा गणेश पाटील, जयवंत साळुंखे, विजय तिबिले, दिलीप शहा, नितीन पारेख, प्रगती राठी, नयना गायकवाड, सतीश शेटे, अमित शहा, संजय ओसवाल, सूर्याजी पवार, जयदीप कोरे, जगदीश चटणे, रंगराव जाधव, डॉ. सदानंद जोशी हे सायकलदाते व देहदान संकल्पाबद्दल भरत पाटील, चंद्रकांत जाधव, भाऊसाहेब कांबळे, सविता पवार-पाटील यांचे सत्कार झाले.

औषध दान व्हावे
जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार काळम यांनी देहदान, नेत्रदान, अवयवदान याबरोबरच औषध दान करण्याचा प्रसार  झाला पाहिजे, त्या दृष्टीने पावले उचलावीत असे मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com