"टिकटॉक'ची स्टंटबाजी  करताना विद्यार्थी जखमी 

2TIKTOK
2TIKTOK

सांगली, ः टिकटॉक व्हिडिओची स्टंटबाजी येथील एका इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगलट आली. त्यात एकाचा हात फॅक्‍चर झाला. पृथ्वीराज प्रशांत देसाई असे या जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. आठवी इयत्तेतील दोघा मुलांचा हा खेळ शिक्षक आणि पालकांना मात्र मोठा मनस्ताप देणारा ठरला. 


तरूणाईत सध्या टिकटॉक व्हिडिओ बनवण्याचा शौक बळावला आहे. सध्या तीन मुलांनी किंवा मुलींनी सामुदायिक उडी मारल्यानंतर दोन्ही बाजूला उभारलेल्यांनी मधल्याच्या पायावर मारून त्याला पकडण्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे अनुकरण सध्या केले जात आहे. यातून मुलांमध्ये स्टंटबाजीही क्रेझ वाढली आहे. सांगलीतील एका शिक्षण संस्थेतील शाळेत दोघा शाळकरी मित्रांनी मंगळवारी सायंकाळी असाच स्टंट करायचा प्रयत्न शाळेत केला. त्यात पृथ्वीराज प्रशांत देसाई या विद्यार्थ्याचा हात फॅक्‍चर झाला. त्याला इस्पितळात हलवताना शिक्षकांची पुरेवाट झाली. 


दरम्यान, हा प्रकार पालकांना समजल्यानंतर धक्का बसला. त्यांनी संस्थेकडे तक्रार केली. याबाबत अन्य संतप्त पालकांनी संस्थाचालकांकडे तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांकडे कोणतीही नोंद नाही मात्र याबाबत शैक्षणिक वर्तुळात मात्र आज दिवसभर चर्चा होती. अशा व्हिडिओचे अनुकरण शाळेतील मुलांनी सुरू केले आहे. जीवघेणे व घातकी खेळांचे व्हिडिओ मुलांवर प्रभाव टाकत आहेत. यातून एखाद्याचा जीव जावू शकतो किंवा गंभीर दुखापत होवू शकते, याची फिकीर मुलांना नसते. अशा स्टंटबाजीतून आनंद मिळवण्याची मानसिकता बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी पालकांसह शिक्षकांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. 


""व्हिडिओचे अनुकरण करून माझ्या मुलास दुखापत झाली आहे. असे जीवघेणे प्रकार कोणीही करू नये. पालकांनीही यासाठी पुढाकार घेवून पाल्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे.'' 
- प्रशांत देसाई, 
जखमी मुलाचे पालक 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com