शिक्षका अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

हुकूम मुलाणी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व नगरपालिका शाळा क्रमांक 4 येथील इ चौथी च्या वर्गाला गेल्या महिन्याभरापासून कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, याकडे  नपा शिक्षण मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे पालकांनी गैरहजर असणाऱ्या शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा अरुणा माळी व राष्ट्रवादीचे नेते राहूल शहा यांच्याकडे देत आपल्या अडचणी मांडल्या. 

याबाबत घटनेची माहिती अशी की न.पा. शाळा नंबर 4 मधील चौथीचे विद्यार्थी विविध स्पर्धापरीक्षा मध्ये यश मिळवून शाळेचा लौकिक वाढवीत आहेत. परंतु नपा शिक्षण मंडळ अधिकाऱयांच्या मनमानी व आढमूठ्या धोरणाने मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणचे शिक्षक अवताडे यांची बदली इतरत्र केल्याने या वर्गावर रोज नवीन शिक्षक दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पालकांनी नपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सचिन अनंत कळवस तसेच नगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे शिक्षक देण्याची मागणी केली. प्रशासनाधिकारी दोन ठिकाणचा पदभार असल्याचे सांगत गैरहजर रहात असतात त्यामुळे पालकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न पालकांना पडला आहे.  नपा शाळांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असताना नियंत्रण नसल्यामुळे गुणवत्ता ढासळू लागली आहे. न पा शाळा मध्ये ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुले पाठवली जातात.

आज होणार्‍या बैठकीत यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी संबंधीताना सांगून तोडगा काढणार आहे.  

- अरूणा माळी, नगराध्यक्षा

Web Title: Student losses for want of teachers