विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तंत्रनिकेतनकडे द्या ; सहकारमंत्र्यांकडे मागणी

प्रमोद बोडके
रविवार, 29 एप्रिल 2018

राज्यातील खासगी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तंत्रनिकेतनचा खर्च, शिक्षकांचा पगार यासह इतर गोष्टी अशक्‍य झाल्या आहेत.

सोलापूर : राज्यातील खासगी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तंत्रनिकेतनचा खर्च, शिक्षकांचा पगार यासह इतर गोष्टी अशक्‍य झाल्या आहेत. हा निर्णय रद्द करून शिष्यवृत्ती तंत्रनिकेतनकडे द्या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्यातील खासगी तंत्रनिकेतन चालकांच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना देण्यात आले. 

जिल्ह्यातील खासगी तंत्रनिकेतन चालकांची बैठक अॅड. विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीत शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम पूर्वीप्रमाणे खासगी तंत्रनिकेतनकडेच देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीचे निवेदन सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. सहकारमंत्री देशमुख यांना निवेदन देताना जयंत आराध्ये, जी. के. देशमुख, गजानन धरणे, अंकुशराव गायकवाड, रणजित देसाई, श्रीकांत जोशी यांच्यासह खासगी तंत्रनिकेतनमधील प्राचार्य, विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Student scholarship give to Technical Department