अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

चिठ्ठीत त्याने लिहिले आहे, की आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पेपरचा ताण सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला तरी मला माफ करा. या साठी कोणीही जबाबदार नाही.

कोल्हापूर : एका खासगी शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. राहूल भैरवनाथ पारेकर (वय 25 पांगरे, करमाळा) असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

चिठ्ठीत त्याने लिहिले आहे, की आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पेपरचा ताण सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला तरी मला माफ करा. या साठी कोणीही जबाबदार नाही.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी टेंबलाई उड्डाणपुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळून आला. या वेळी पोलिसांनी पाहणी करून तपासणी केली असता पोलिसांना मोबाईल, एटीएम कार्ड तसेच चिठ्ठी सापडली. मोबाईलची तपासणी केली असता काही मित्रांचे नंबर मिळून आले. मित्रांनी मृतदेह ओळखला. काल संध्याकाळीच तो हॉस्टेलमधून निघून गेल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून दोन वर्षांपूर्वी देखील पेपर अवघड गेल्याच्या कारणातून त्याने हॉस्टेल मधून पलायन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: student suicide in Kolhapur