पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

गडहिंग्लज - अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे बारावी परीक्षेत पेपर अवघड गेल्याच्या नाराजीतून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंजुनाथ शिवानंद कोरवी (वय १८) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज सकाळी आठच्या दरम्यान ही घटना निदर्शनास आली.

पोलिसांनी सांगितले, की अरळगुंडी येथे कडलगे रोडवरील नवीन वसाहतीत कोरवी यांचे घर आहे. मंजुनाथने यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. परीक्षा झाल्यापासून तो काहीसा नाराज होता. त्याला पेपर अवघड गेले होते. या नाराजीतूनच त्याने आज सकाळी शंकर पाटील यांच्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. 

सकाळी साडेसहाला शौचास बाहेर पडलेला मंजुनाथ अजून घरी आला नाही म्हणून आठच्या सुमारास नातेवाईक त्याला पाहण्यासाठी गेले. त्या वेळी तो गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत आढळला. शिवानंद कोरवी यांनी पोलिसांत 
वर्दी दिली. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत. दरम्यान, मंजुनाथच्या मागे आई, वडील, एक भाऊ व आजी असा 
परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com