विद्यार्थ्यांनी कर्तव्यातून टेंपोभर प्लॅस्टिक कचरा गोळा केला

विद्यार्थ्यांनी कर्तव्यातून टेंपोभर प्लॅस्टिक कचरा गोळा केला

सातारा : सातारा शहर कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त व्हावे, यासाठी कर्तव्य सोशल गुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठ शाळांनी यामध्ये सहभाग घेऊन सुमारे तीन टेंपो प्लॅस्टिक कचरा गोळा केला.
 
कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेतर्फे शहर परिसरातील शाळांना प्लॅस्टिक मुक्तीसाठी आवाहन केले होते. जानेवारी 2020 पासून हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमांतर्गत आठ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत दूध- तेल पिशवी, पाण्याची बाटली, प्लॅस्टिक पाऊच, किराणा मालासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, चॉकलेट रॅपर, तुटक्‍या वॉटर बॅग, प्लॅस्टिक चप्पल, डबे, कंपास, फोल्डर यासह प्लॅस्टिकपासून बनलेल्या तुटक्‍या, निरुपयोगी वस्तू असा सर्व प्रकारचा कचरा गोळा केला.

जे. डब्ल्यू. आयरन ऍकॅडमी, सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल, अजिंक्‍यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रे, हत्तीखाना शाळा, ब्लॉसम स्कूल, छत्रपती शाहू ऍकॅडमी, नवीन मराठी शाळा, लोकमंगल हायस्कूल, कुशी या शाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत तब्बल एक टेंपो प्लॅस्टिक कचरा गोळा केला. हा गोळा झालेला कचरा कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे वाहनात भरुन विघटनासाठी नेण्यात आला. या वेळी प्लॅस्टिक मुक्तीची शपथ घेऊन माझे घर, माझी शाळा आणि माझा सातारा कचरामुक्त करण्याचा निर्धार केला. 
या अभिनव उपकमात शहरातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे. आपल्या शाळेचा परिसर आणि पर्यायाने आपले सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कर्तव्य सोशल गुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

नक्की वाचा : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

हेही वाचा :  भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

वाचा : बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे

जरुर वाचा : लढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम

हेही वाचा :   ...म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला पडलीय या भागाची भुरळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com