बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मूळचा श्रीरामपूर तालुक्‍यातील खंडाळा येथील सोमनाथ अभंग शिक्षणासाठी चंदनापुरी येथील मामा गोकुळ अण्णासाहेब बोऱ्हाडे यांच्याकडे राहत होता.

संगमनेर : तालुक्‍यातील चंदनापुरी येथे मित्रांसोबत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रविवारी (ता. एक) सायंकाळी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. सोमनाथ ऊर्फ वैभव अशोक अभंग (वय 18) असे मृत युवकाचे नाव आहे. 

somnath abhang

मृत सोमनाथ अभंग

हेही वाचा- लोणीतील गोळीबारात एकाचा मृत्यू 

अशी घडली घटना 

मूळचा श्रीरामपूर तालुक्‍यातील खंडाळा येथील सोमनाथ अभंग शिक्षणासाठी चंदनापुरी येथील मामा गोकुळ अण्णासाहेब बोऱ्हाडे यांच्याकडे राहत होता. येथील चंदनेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखेत तो बारावीत शिकत होता. रविवारी सुटी असल्यामुळे तो मित्रांसह गावाजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सायंकाळी चारच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. परतीच्या पावसाने बंधारा तुडुंब भरला आहे. 

हेही वाचा-  "कर्जतला जायचंय?' "...नको रे बाबा !' मृतसोमनाथ अभंग 

खोलीचा अंदाज आला नाही 

पोहताना बंधाऱ्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने पाण्यातून बाहेर काढले. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

एकुलता एक मुलगा

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला सोमनाथ ऊर्फ वैभव अभंग महाविद्यालयातील हुशार विद्यार्थी होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students dies in drowning