व्हिडीओ निर्मितीमधून शैक्षणिक दृष्टीकोनात बदल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

लाजऱ्या बुजऱ्या मुलांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. स्वतःला व्हिडिओमध्ये पाहून त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

सोलापूर : शासनाने नुकतीच दीक्षा अॅपची निर्मिती केली असून या माध्यमातून वर्गातील उपक्रमांवर आधारित व्हिडिओ निर्मिती केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्‍वास वाढला. लाजऱ्या बुजऱ्या मुलांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. स्वतःला व्हिडिओमध्ये पाहून त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या उपक्रमासाठी शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांनी मुलांचे काही व्हिडीओ काढून इंटरनेटवर अपलोड केले आहेत.

त्या म्हणतात, ज्ञानाच्या वाटा खुल्या आहेत. ज्ञानग्रहणाचे अनेक मार्ग आहेत. हात सर्व कामी आणि बुद्धी सर्वगामी' असावी. बुद्धी सर्वगामी होण्यासाठी पंचेंद्रियांचा विकास महत्तवाचा. पंचेंद्रियांपैकी महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांमार्फत 83 टक्‍के ज्ञानग्रहण होते. मग यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाविन्यपूर्ण आणि आकर्षक व्हिडिओ, त्यामधील ऑडिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मुलांना आनंददायी शिक्षण मिळते आणि म्हणूनच पाठ्यपुस्तकाबरोबर पाठांवर आधारित व्हिडिओचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तंत्रज्ञानाची कास हाच माझा ध्यास आणि म्हणूनच मी पाठांवर आधारित व्हिडिओ बनवते. माझ्या व्हिडीओमधील आवाज माझ्या वर्गातील मुलांचेच असतात. वर्गातील उपक्रमांवर आधारित व्हिडिओ निर्मिती केली. यामुळे माझ्या ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्‍वास वाढला. स्वतःला व्हिडिओमध्ये पाहून त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सध्या शासनाने नुकतेच दीक्षा अॅपची निर्मिती केली. तंत्रज्ञानातील अनेक स्नेहींनी एकस्टेपच्या माध्यमातून आपल्यातील कौशल्य पणाला लावून कंटेंट निर्मिती केली. सध्या पालकांमध्ये दीक्षा ऍपबद्दल उत्सुकता आहे. माझ्या शाळेत पालकांना या अॅपबद्दल सांगितले असून यामुळे मुलांचा गृहपाठ करून घ्यायची काळजी मिटली असे पालक आवर्जुन सांगतात. 

मुलांना अभ्यास कर असं वारंवार सांगण्याची गरज उरली नाही. मुले स्वतःहून मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहून स्वयंस्फूर्तीने अभ्यास करू लागली आहेत. व्हिडीओमधून आंददायी शिक्षण, ज्ञान मिळते. मोबाईलवर नुसतेच गेम्स खेळणारी मुले पुस्तकावरील व्हिडिओ, अॅप शोधू लागली आहेत. 
- सुप्रिया शिवगुंडे, शिक्षिका

Web Title: Students learn about the Diksha app in School in solapur