सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांचा विद्यापीठातच ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर - बीबीए द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील इंटरनॅशनल बिझनेस आणि ऑर्गनायझेशन बिहेविअर या दोन विषयांची १४ व १६ मे रोजी फेरपरीक्षा घेण्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात हिरांचद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, संगमेश्‍वर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत फेरपरीक्षेचा निर्णय रद्द होत नाही तोवर हा ठिय्या कायम राहील, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

सोलापूर - बीबीए द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील इंटरनॅशनल बिझनेस आणि ऑर्गनायझेशन बिहेविअर या दोन विषयांची १४ व १६ मे रोजी फेरपरीक्षा घेण्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात हिरांचद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, संगमेश्‍वर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत फेरपरीक्षेचा निर्णय रद्द होत नाही तोवर हा ठिय्या कायम राहील, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. हिराचंद नेमचंद कॉलेजच्या पूर्व परीक्षेसाठी विद्यापीठाची प्रश्‍नपत्रिका वापरल्याची तक्रार संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी केली होती.

Web Title: Students stay at the solapur university