Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांसाठी उडाळेतील विद्यार्थांनी ८२०० रूपयांची केली मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

उंडाळे : येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या विद्यार्थांनी केरळमधील पुरग्रस्तांसाठी ८२०० रूपये मदत गोळा केली आहे. जमा झालेली रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तहसिलदारांकडे जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थांनी गावात फिरून गोळा केलेली रक्कमेतून पुरग्रस्ताच्या मदतीसाठी हा "खारीचा वाटा" ठरला असुन या उपक्रमाबद्दल विद्यार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, मागील चार पाच दिवसापुर्वी सर्वत्र पावसाचा हाहाकार उडाला होता. विशेष करून केरळमध्ये आलेल्या महापुराने तेथे प्रचंड नुकसान झाले . तर अनेकांनी प्राण ही गमवावे लागले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली. हजारो नागरिक बेघर झाले . शासन, सैन्य, पोलिस व अनेक स्वयंसेवी संस्थानी मोठा प्रमाणात पुरग्रस्तांना मदत केली. त्यांचे टिव्ही, मोबाईलवरून चित्रण सर्वांना पहायला मिळाले.

या विद्यालयाच्या विद्यार्थांचे  ही पुराच्या बातम्या पाहून मन हेलावले. त्यांनी ही पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे मदतीसाठी देवू केले. मदत जमा करण्यासाठी मदतपेटी तयार करून विद्यार्थांनी ही पेटी विद्यार्थी, शिक्ष , गावातील दुकानदार, ग्रामस्थातुन फिरवली त्याला सर्वांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामधुन ८२०० रूपये जमा झाले आहेत. ही मदत कराड तहसिलदार यांच्याकडे जमा करण्यात येणार आहे . या उपक्रमाबद्दल विद्यार्थीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Web Title: Students who helped out Rs. 8,200 in Kerala floods