उपसमित्यांच्या निवडी बेकायदा - डुबुले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने गठित केलेल्या उपसमित्यांवरील निवडी बेकायदा असून त्या रद्द कराव्यात, अशी तक्रार माजी सभापती भारत डुबुले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. 

उपसमितीमध्ये स्वीकृत सदस्यांना घेता येत नाही. कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवारच्या सभापतिपदी दादासाहेब कोळेकर यांची नियुक्ती केली आहे. कोळेकर यांच्या निवडीवर आक्षेप घेतल्याने सत्ताधारी कदम गट आणि विरोधी घोरपडे गटातील वाद चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले.

ते म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या १७ जानेवारीला झालेल्या सभेत उपसमित्यांमध्ये शासनाने नियुक्त केलेल्या स्वीकृत संचालकास उपसमितीचे सभापती केले आहे. शासननियुक्त सदस्यांस मत मांडता येते, सूचक किंवा अनुमोदक होता येत नाही. कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार सभापतिपदी दादासाहेब कोळेकर यांची उपसमितीचे सभापती म्हणून निवड केली. शासनाच्या अधिनियमानुसार व बाजार समितीच्या मंजूर उपविधीप्रमाणे बाजार समितीस बारा उपसमित्यांची मंजुरी आहे. त्यामधील उपसमितीचे मुख्य म्हणून कोळेकर यांची निवड बेकायदा करण्यात आली आहे. 

ती रद्द करण्याची मागणी आहे. उपबाजार आवारामध्ये झालेल्या खर्चास उपसमितीचे सभापती जबाबदार असतात. शासननियुक्त सदस्यास कोणताही अधिकार नसल्याने कवठेमहांकाळ बाजार आवारामध्ये केलेल्या नियमबाह्य खर्चाची जबाबदारी कोण घेणार?’’

पाच कोटीपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर चार तज्ज्ञ विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात येते. त्यात सांगलीचा समावेश आहे. दादासाहेब कोळेकर, विठ्ठल निकम, उमेश पाटील, सुरेश पाटील यांचा चौघांचा समावेश आहे. विशेष निमंत्रितांतील कोळेकरांची कवठेमहांकाळ बाजार आवार सभापतिपदी निवड केली आहे.

Web Title: subcommittee the choice of illegal