सोलापूर बाजार समिती निवडणूक; पालकमंत्री-माने पॅनेल आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पालकमंत्री देशमुख, माजी आमदार माने, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर, कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर हे देशमुख-माने यांच्या विकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. सहकारमंत्री देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे रामप्पा चिवडशेट्टी व अप्पासाहेब पाटील हे आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे हे पिछाडीवर आहेत.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजपचे असलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख व कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनेलने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पॅनेल पिछाडीवर पडले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी मतदारसंघातून एकूण 15 जागांसाठी मतदान झाले. त्या गणामध्ये असलेल्या एकूण मतदानाच्या आधारे फेऱ्या निश्‍चित केल्या आहेत. नऊ ते 13 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. त्यापैकी पहिल्या चार ते सहा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्या एक-दोन जागांचा अपवाद वगळता सहकारमंत्री देशमुख यांचे पॅनेल पिछाडीवर असल्याचे दिसून येते. पालकमंत्री देशमुख व माने यांच्या पॅनेलकडे विजयी आघाडी मिळाल्याचेही चित्र दिसून येते.

पालकमंत्री देशमुख, माजी आमदार माने, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर, कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर हे देशमुख-माने यांच्या विकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. सहकारमंत्री देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे रामप्पा चिवडशेट्टी व अप्पासाहेब पाटील हे आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे हे पिछाडीवर आहेत.

Web Title: Subhash Deshmukh panel in Solapur