‘संजय शिंदेंनी राजीनामा देऊन पवारांचा प्रचार करावा’

‘संजय शिंदेंनी राजीनामा देऊन पवारांचा प्रचार करावा’

पंढरपूर - संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवून देण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून आधी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच शरद पवारांचा प्रचार करावा, असे सूचक विधान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काल (रविवार) येथे केले.

भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंत्री देशमुख  काल पंढरपुरात आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे-परिचारकांना टोला लगावला. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘शरद पवारांच्या उमेदवारीमुळे संजय शिंदे व आमदार परिचारकांची घुसमट होत असावी. संजय शिंदेंना भाजपने अध्यक्षपद मिळवून दिले आहे. त्यामुळे श्री. शिंदे यांनी आपली लोकसभा निवडणुकीत ठोस भूमिका जाहीर करावी. भाजपला त्यांनी वाऱ्यावर सोडू नये. शरद पवारांचा त्यांना प्रचार करायचा असेल तर शिंदे आणि परिचारकांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत. त्यानंतर त्यांनी पवारांचा प्रचार करावा, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. 

‘त्यांना स्वप्न पडलंय का?’
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना विचारले असता, मी शरद पवारांचा प्रचार करणार, असं सुभाष देशमुखांना स्वप्न पडलंय का? असा टोला त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com