साताऱ्यात विषय समिती ‘सभापतीं’साठी मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सातारा - पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. सात) सकाळी अकराला सुरू होणार आहे. प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 

सातारा - पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. सात) सकाळी अकराला सुरू होणार आहे. प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 

रविवारी (ता. सहा) सध्याच्या सभापतींची मुदत संपत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षांसह पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, नियोजन व महिला व बालकल्याण या पाच समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर शहरातील पालिकेचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांची निवड करताना सातारा विकास आघाडीला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे या विषय समित्यांवर वर्णी लागण्यासाठी सातारा विकास आघाडीमध्ये मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी नगरसेवक किशोर शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत शहरातील राजकीय वातावरण चांगलेच सक्रिय राहण्याची चिन्हे आहेत. 

सोमवारी सकाळी सव्वाअकराला विषय समित्यांचा तपशील नगरसेवकांना सांगणे, साडेअकराला उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी १२ वाजता अर्जाची छाननी, दुपारी १२.३० वाजता पसंतीक्रमानुसार गुप्त मतदान पध्दती राबवणे, १२.४५ ते१.४५ नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, १.४५ वाजता अर्ज छाननी, दुपारी दोनपर्यंत अर्ज माघारी घेणे, सव्वादोननंतर सभापती निवडी जाहीर करणे, असा हा कार्यक्रम राहणार आहे.

Web Title: Subject Committee Chairman Selection Politics