पडळकरवाडी टेंभू कालवा गट दुरुस्ती लढ्याला अखेर यश 

success for tembhu canal group changing fight
success for tembhu canal group changing fight

झरे (जि. सांगली) - पडळकरवाडी (ता. आटपाडी) येथील टेंभू योजनेच्या डाव्या कालव्यामध्ये शेत जमीन गेले ली असून संपूर्ण गावचा नकाशा चुकल्याने कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही. गट दुरुस्तीचे काम जवळजवळ दोन वर्ष झाले सुरू आहे. टेंभू कार्यालयाने पत्रव्यवहार करायचा, त्याला भूमीअभिलेखने उत्तर द्यायचे, हा पत्रव्यवहार दोन वर्षांपासून सुरू आहे. पण अजूनही गट दुरुस्त करायचे राहिले आहे. या संपूर्ण घोळत शेतकऱ्याची मात्र हेळसांड होत आहे. 
यासाठी पडळकरवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पडळकर यांनी पूर्वीपासून पाठपुरावा केला व भूमी अभिलेख मधील मुख्यालय सहाय्यक ए. एस. मांडवे यांच्या मदतीने उपाधिक्षक भुमी अभिलेख आटपाडी लता घरत व टेंभूचे उपविभागीय अभियंता व्हि. एम. मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व त्या चर्चेत दोन्ही खात्याची बैठक येणाऱ्या शुक्रवारी घेऊन कालवा गट दुरुस्तीचा कायमचाच प्रश्न मिटविण्याचा ठरले आहे. 

दोन्ही कार्यालयाने एकमेकांना पत्रव्यवहार करून हा प्रश्न मिटणार नाही हे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर भुमिअभिलेखचे अधिकारी व टेंभू कार्यालयाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक शुक्रवारी घेण्याचे ठरले आहे. यामध्ये बैठकीत गट दुरुस्तीचा तोडगा कायमचा निघेल अशी शेतकऱ्यांना अशा आहे. 
या बैठकीत तर टेंभूचा प्रश्‍न कायमचा मिठवा यासाठी टेंभू कार्यालयालाने व भुमिअभिलेख कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या बैठकीस टेंभूचे भुमी अभिलेख अधिकारी व ग्रामस्थ नंदू माने, दादा सरगर, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर सर्व गट दुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव टेंभू कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लवकरच सादर करतील अशी अपेक्षा पडळकर यांनी व्यक्त केली. 

दोन वर्षांपासून लढा सुरू 
कालवा गट दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्यासाठी दैनिक सकाळने आम्हाला ताकद दिली. तसेच भूमी अभिलेखचे अधिकारी टेंभू योजनेचे अधिकारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. 
-विठ्ठल पडळकर, माजी सरपंच पडळकरवाडी 

दैनिक सकाळने या लढ्याला ताकद दिली

पूर्वीपासून गावचा नकाशा चुकला होता. तो दुरुस्त करण्यासाठी माजी सरपंच विठ्ठल पडळकर हे झटत होते तर दैनिक सकाळने या लढ्याला प्रचंड ताकद दिली. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. येणाऱ्या बैठकीमध्ये कायमचा तोडगा निघून गट दुरुस्त होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे. 
-ब्रम्हानंद पडळकर, माजी समाज कल्याण सभापती  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com