covid
covidcovid

मुलांच्या संरक्षणासाठी सांगलीकर दक्ष!

Summary

सध्या या कक्षात ९ मुलांवर उपचार सुरू आहेत.

सांगली : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (children) बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सरकारने आतापासूनच स्पेशल टास्क फोर्स तयार करून लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे, उपाय तसेच रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर तयार करणे आदी उपायांवर विचार मंथन सुरू केले आहे. पण, तत्पूर्वीच सांगलीत डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटर, आरोग्य विश्व कोविड सेंटर येथे कोरोना बाधित असलेल्या लहान मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. (successful treatment of children is being done at two covid care centres in sangli)

covid
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगली मिरजेतील भेटी आजही चर्चेल्या जातात

काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी प्रभाग १८ मध्ये महात्मा गांधी विद्यालयात सुरू केलेल्या डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटरमध्ये खास पंचवीस बेडचे कोरोना बालरुग्ण कक्ष स्वतंत्र सुरू केला आहे. या ठिकाणी त्यांनी लहान मुलांसाठी खेळणी तसेच भिंतींवर कार्टून्स त्याचबरोबर सिंधुदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड अशा गडकोटांचे सामान्य ज्ञान देणारे माहितीचे फलक तयार केले आहेत. यामुळे मुलांना तेथे रुग्ण न वाटता त्यांचा मनोरंजनात वेळ जातो. सध्या या कक्षात ९ मुलांवर उपचार सुरू आहेत.

covid
कोरोनाकाळ ठरतोय बालविवाहकाळ; सांगली जिल्ह्यात रोखले पंचवीस बालविवाह

कॉंग्रेसचे आणखी एक नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी गणेशनगरमधील रोटरी क्लबमध्ये सुरू केलेल्या आरोग्य विश्व कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित असलेल्या मुलांवरही उपचार करण्यात येत आहेत. या केंद्रातून तीन मुले नुकतीच कोरोनामुक्त होऊन घरी गेली. या ठिकाणी कोरोना बाधित लहान मुलांवर उपचार करण्याची तयारी केली आहे. या सेंटरमध्ये सांगलीतील पाच वर्षीय मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा, कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथील तीन वर्षाची बालिका अशा तीन बालकांवर आरोग्यविश्‍व कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. बिंदूसार पलंगे, सेंटरमधील डॉ. राजकुमार पाटील, डॉ. प्रियांका शिंदे, अंकिता लोखंडे यांनी उपचार केले.

covid
कोल्हापूर, सांगली महावितरणच्या 500 कर्मचार्‍यांचा सेवाभाव

महापालिका क्षेत्रात १८२८ बालरुग्ण

महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजवर एकूण १८२८ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. गतवर्षी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत रुग्णांचा आकडा मोठा होता. त्यानंतर तो घटत गेला. दुसरी लाट सुरू झाल्यावर मार्चपासून पुन्हा लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले. गेल्या तीन महिन्यात ६८८ लहान मुले कोरोनाबाधित झाली आहेत. मार्च महिन्यात ४१, एप्रिल महिन्यात ३५५ तर मे महिन्यात आतापर्यंत २९२ बालरुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच लहान मुलांतसुद्धा कोरोनाचे वाढते प्रमाण दिसू लागले आहे. त्यामुळे हा बाल रुग्ण कक्ष सुरू केला. या कक्षात बाल रोग तज्ञ डॉ. सुकुमार गावडे पूर्ण वेळ मोफत सेवा देत आहेत. या ठिकाणी सात वर्षावरील बालके आहेत.

- अभिजित भोसले, नगरसेवक

(successful treatment of children is being done at two covid care centres in sangli)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com