सहाय्यक फौजदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

sucide attempt of Ass. Police inspectors son
sucide attempt of Ass. Police inspectors son

सोलापूर : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सहाय्यक फौजदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पोलीस मुख्यालय परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या पोलीस वेल्फेअर बेकरीमध्ये घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास उघडकीस आला. 

आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही; चंद्रकांत पाटील यांचा टोला (व्हिडिओ)

अखिल अब्दुल सत्तार मुल्ला (वय 20, रा. पोलिस मुख्यालय, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, असे पोलिस निरीक्षक जे. एन. मोगल यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी पुण्याला जातो असे सांगून अखिल घरातून बाहेर पडला होता. तो पुण्याला गेला असावा असे घरातील मंडळींना वाटले. गुरुवारी दुपारच्या सुमारास घरासमोर असलेल्या बंद अवस्थेत असलेल्या बेकरीमधून वास येत असल्याने नागरिकांनी आतमध्ये डोकाऊन पाहिले. आतमध्ये कोणीतरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत जेलरोड पोलिसांना कळविण्यात आले.

देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

त्यानंतर काही वेळातच पोलिस निरीक्षक मोगल आणि त्यांच्या पथकाने धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी आत्महत्या केलेल्या तरुणास ओळखले. अखिल याने आत्महत्या केल्याचे कळताच त्याच्या कुटूंबांनी आक्रोश केला. अखिलचे वडील अब्दुल सत्तार मुल्ला आहे शहर पोलीस आयुक्तालयातील अतिक्रमण विभागात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत आहेत. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com